Share

“आज घरातलं कुणीतरी गेल्यासारखं वाटतंय…”; अजितदादांच्या आठवणीत ‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता ढसाढसा रडला!

अजित पवारांच्या निधनानंतर मराठी अभिनेता संकर्षण कराडे याने अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. “दादांच्या जाण्याने आधार गेला,” अशा शब्दांत त्याने शोक व्यक्त केला.

Published On: 

Sankarshan Karhade Post: अजितदादांसाठी संकर्षणची पोस्ट व्हायरल; म्हणाला...

🕒 1 min read

राजकारणातली माणसं बहुतेकदा फक्त बातम्यांचा विषय असतात, पण काही व्यक्तिमत्त्व अशी असतात जी थेट काळजाला भिडतात. त्यांच्या असण्यानेच एक वेगळा ‘सेन्स ऑफ सिक्युरिटी’ वाटतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यापैकीच एक होते. त्यांच्या अचानक जाण्याने (Death) केवळ राजकीय वर्तुळच नाही, तर सिनेसुष्टीही हादरली आहे. सर्वांचा लाडका अभिनेता संकर्षण कराडे (Sankarshan Karhade) याने सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावना वाचून तुमचाही कंठ दाटून येईल.

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर संकर्षणने Instagram वर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. संकर्षण म्हणतो, “काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली की आधार वाटतो. आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटत आहे, खूप त्रास होतोय.”

Sankarshan Karhade Post

दादांच्या स्वभावाची आठवण काढताना संकर्षणने त्यांच्या ‘मिश्किल’ शैलीचा खास उल्लेख केला. “गंभीर प्रश्नांवर पण मिश्किल उत्तर देऊन Press Conference गप्पांमध्ये बदलायची त्यांची शैली कमाल होती,” असं म्हणत त्याने दादांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांच्या पंखाखाली वाढलेले अनेक कार्यकर्ते आज ‘पोरके’ झाल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.

दरम्यान, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या कठीण प्रसंगी पवार कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), शर्मिला ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांच्यासह अनेक दिग्गज बारामतीत पोहोचले आहेत.

झिशान सिद्दीकी, विश्वजीत कदम, नवाब मलिक यांसारखे नेते आणि हजारो कार्यकर्ते साश्रू नयनांनी दादांची वाट पाहत आहेत. अहमदनगरच्या देवळाली प्रवरा ते राज्याचे उपमुख्यमंत्री हा अजितदादांचा प्रवास आज थबकला असला, तरी संकर्षणने म्हटल्याप्रमाणे, “अजित दादा.. तुमची खूप आठवण येत राहील…”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही