शिवम दुबेचं वादळ, न्यूझीलंडची दाणादाण; 6 सिक्स ठोकत मोडला हार्दिक पंड्याचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड!

शिवम दुबेने न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक ठोकून खळबळ उडवून दिली आहे. त्याने या खेळीत तब्बल 6 षटकार लगावले.

Published On: 

Shivam Dube 50: 15 चेंडूत धमाका! युवराजच्या रेकॉर्डजवळ पोहोचला दुबे

सिक्सर किंग युवराज सिंगची आठवण यावी, अशी खेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाली, तर काय वाटेल? असाच काहीसा थरार काल  विशाखापट्टणममध्ये क्रिकेट चाहत्यांनी अनुभवला. न्यूझीलंडच्या (IND vs NZ T20) गोलंदाजांना अक्षरशः रडकुंडीला आणत शिवम दुबे (Shivam Dube) याने मैदानावर जो काही ‘धिंगाणा’ घातलाय, त्याची चर्चा आता जगभरात सुरू झाली आहे.

विशाखापट्टणमच्या एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर न्यूझीलंडने टीम इंडियासमोर 216 धावांचा डोंगर उभा केला होता. या भव्य आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. अभिषेक शर्मा आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. संजू सॅमसन (24) आणि रिंकू सिंग (39) यांनी थोडा प्रतिकार केला, पण मोठी धावसंख्या उभारण्यात ते अपयशी ठरले. खुद्द हार्दिक पंड्याही अवघ्या 2 धावांवर बाद झाल्याने भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

IND vs NZ T20

सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शिवम दुबेने हर्षित राणाच्या साथीने न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसं काढली. आल्या आल्या त्याने आक्रमक पवित्रा घेतला. जेकब डफीच्या 13 व्या ओव्हरमध्ये पाचव्या बॉलवर उत्तुंग षटकार खेचत शिवमने अवघ्या 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं! त्याचा हा रुद्रावतार पाहून किवी गोलंदाजही हबकले होते.

या वादळी खेळीत शिवमने 6 सिक्स आणि 2 चौकार लगावले. त्याचा Strike Rate तब्बल 346.67 इतका राहिला. विशेष म्हणजे, या खेळीसह त्याने हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 16 चेंडूत अर्धशतक केले होते, तर शिवमने 15 चेंडूत ही किमया साधली.

आता भारताकडून टी-20 मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्यांच्या यादीत शिवम तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या क्रमांकावर आजही युवराज सिंग (12 चेंडू) आणि दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक शर्मा (14 चेंडू) विराजमान आहेत. शिवमच्या या ‘पॉवर-हिटिंग’मुळे टीम इंडियाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही