🕒 1 min read
विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या टीम इंडियाला न्यूझीलंडने जोरदार धक्का दिला आहे. एकीकडे शिवम दुबेने (Shivam Dube) मैदानात अक्षरशः आग ओकली, पण तो एकटा लढवून काय करणार? विशाखापट्टणममध्ये धावांचा पाठलाग करताना भारताची दाणादाण उडाली आणि भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
न्यूझीलंडने विजयासाठी भारतासमोर 216 धावांचे (Target) मोठे आव्हान ठेवले होते. यापूर्वी भारताने 209 धावा यशस्वीपणे चेस केल्या होत्या, त्यामुळे अपेक्षा उंचावल्या होत्या. संपूर्ण टीम इंडिया 18.4 ओव्हरमध्ये 165 धावांवर ऑलआऊट झाली. भारताची सलग विजयाची मालिका जरी खंडित झाली असली, तरी 5 सामन्यांच्या मालिकेत भारत अजूनही 3-1 ने आघाडीवर आहे.
IND vs NZ T20
216 धावांचा पाठलाग करताना सुरुवातच ‘धक्कादायक’ झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच बॉलवर परतला. कॅप्टन सूर्यकुमार यादवही (8 धावा) अपयशी ठरला. संजू सॅमसन (24) आणि रिंकू सिंग (39) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण मोठी धावसंख्या उभारण्यात ते नापास झाले. हार्दिक पंड्या तर अवघ्या 2 धावांवर परतल्याने भारताच्या अडचणी वाढल्या होत्या.
एकीकडे विकेट्स पडत होत्या, पण सहाव्या क्रमांकावर आलेल्या शिवम दुबेने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने हर्षित राणासोबत 27 चेंडूत 63 धावांची पार्टनरशीप केली. शिवमने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत इतिहास रचला. त्याने 23 चेंडूत 7 सिक्स आणि 3 चौकारांसह 65 धावा कुटल्या. पण तो नॉन-स्ट्राइक एंडवर दुर्दैवीरित्या रनआऊट झाला आणि तिथेच भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या.
तत्पूर्वी, न्यूझीलंडच्या टीम सायफर्ट (62) आणि डेव्हॉन कॉनव्हे (44) यांनी शतकी भागीदारी करत भारताला बॅकफूटवर ढकलले होते. गोलंदाजीत कॅप्टन मिचेल सँटनरने 3 विकेट्स घेत भारताचे कंबरडे मोडले.
📌 महत्वाच्या बातम्या
- “मला आयुष्यभर तो पश्चाताप राहील…”; अजितदादांच्या आठवणीत ऑलिंपिक विजेती पीव्ही सिंधू गहिवरली!
- शिवम दुबेचं वादळ, न्यूझीलंडची दाणादाण; 6 सिक्स ठोकत मोडला हार्दिक पंड्याचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड!
- अजितदादांच्या वैमानिकाचा ‘धक्कादायक’ रेकॉर्ड! दोनदा ‘अल्कोहोल टेस्ट’मध्ये फेल; ३ वर्ष घरी बसवला होता?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











