Share

पडद्यामागं हालचालींना वेग! Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबत घेतला मोठा निर्णय?

Due to extortionist Walmik Karad, the demand for resignation of Minister Dhananjay Munde has gained momentum.

by MHD

Published On: 

Vikram Kale statement regarding Dhananjay Munde resignation

🕒 1 min read

Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. खंडणीप्रकरणी अटकेत असणारा वाल्मिक कराड (Walmik Karad) हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे.

याच मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली, भेटीदरम्यान शाह यांनी मुंडेंचे नाव समोर आले तर त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल, असे वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता मुंडेंच्या राजीनाम्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

“संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय पक्ष घेईल. मस्साजोग या प्रकरणात कोणालाही आमचा पक्ष आणि सरकार पाठीशी घालणार नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांनी केले आहे.

Vikram Kale statement on Dhananjay Munde resignation

त्यामुळे आता संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे नाव समोर येते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर याप्रकरणी त्यांचे नाव समोर आले तर नाइलाजाने धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांना घ्यावा लागेल. इतकेच नाही तर मुंडेंची राजकीय कारकीर्द देखील संपुष्टात येऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही