🕒 1 min read
Chhagan Bhujbal । मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ हे मागील काही दिवसांपासून नाराज आहेत. अनेकवेळा त्यांनी आपली नाराजीही बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे त्यांची नाराजीही दूर करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही.
याचदरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचीही भेट घेतली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबतही कारने एकत्र प्रवास केला होता. त्यामुळे भुजबळ पक्ष सोडून जाणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. अशातच आता भर पडली आहे एका बॅनरची.
आज गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत मालेगावला सहकार परिषद संपन्न होत असून भुजबळ देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजीही केली आहे. परंतु बॅनरवरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह काढून टाकले आहे.
Chhagan Bhujbal meet Amit Shah
त्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ घड्याळाची साथ सोडून हाती कमळ घेणार का? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. जर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला तर हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळासह अजित पवारांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी, Ajit Pawar यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे मोठी खळबळ
- Walmik Karad नंतर त्याची मुलंही जाणार जेलमध्ये? Suresh Dhas यांचा दावा; म्हणाले, “त्यांनी १५० कॉल…”
- Dhananjay Munde यांच्यामुळे ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या वाढल्या अडचणी, हायकोर्टात होणार महत्त्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










