Ajit Pawar । विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने जाहीरनाम्यात कर्जमाफीचे (Farmer Loan Waiver) आश्वासन दिले होते. शिवाय लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) देखील दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. पण आता यावरून महायुतीत वाद पेटल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीमध्ये वाद निर्माण झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. कर्जमाफीला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोध दर्शवला असून त्यावरूनच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 5 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार असल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकारला परवडणार नाही, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा भाजपने (BJP) निवडणुकीदरम्यान त्यांच्या जाहीरनाम्यात मांडला होता. पण आपण असे कोणतेही आश्वासन जनतेला दिलं नसल्याचं राष्ट्रवादीचं मत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Ajit Pawar on Farmer Loan Waiver
तर विधानसभा निवडणुकीदरम्यान आपण महायुती म्हणून एकत्र लढलो आहोत, त्यामुळे हा विषय महायुतीचा असल्यामुळे यावर एकत्र तोडगा काढावा लागणार आहे, असे भाजपचं मत आहे. दरम्यान, आता हाच मुद्दा उचलून धरत विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :