Dhananjay Munde । वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यामुळे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहे. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) धनंजय मुंडेंचे नाव समोर आले तर त्यांना राजीनामा द्यावा लागू शकते, असे सांगितले आहे.
अशातच आता धनंजय मुंडे यांच्यामुळे काही अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. कृषिमंत्री पदी असताना धनंजय मुंडे यांच्यावर फवारणी पंपाच्या खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. त्यावेळी 2,600 रुपयांचा कृषीपंप 3,650 रुपयाला खरेदी (Agricultural pump scam) केला होता. याप्रकरणावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात 29 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
या प्रकरणामध्ये ज्या अधिकाऱ्यांचा हात आहे, त्यांचा अडचणीत मोठी वाढ होणार आहे. यावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. जर या घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव समोर आले तर त्यांना मोठा धक्का बसू शकतो.
Dhananjay Munde Agricultural Pump Scam
परिणामी, धनंजय मुंडे यांचे पद जाऊन त्यांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. जर असे झाले तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही ब्रेक लागू शकतो. त्यामुळे हायकोर्टाच्या या सुनावणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे आधीच वाल्मिक कराडमुळे अडचणीत आले आहेत. त्यात नवा घोटाळा समोर आल्याने त्यांना पुन्हा एकदा खूप मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :