Suresh Dhas । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने ते मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर गंभीर आरोप करत असतात. आता त्यांनी वाल्मिक कराडच्या मुलांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, महादेव मुंडे यांची २२ ऑक्टोबर २०२३ रोजी खून (Mahadev Munde murder case) झाला होता. या घटनेला वर्ष दीड वर्ष होऊन देखील कुटुंबाला अजून न्याय मिळाला नाही. त्यामुळे आरोपी मोकाट असून पोलीस तपास करीत नसल्याचा आरोप धस यांच्याकडून केला जात आहे.
महादेव मुंडे खून प्रकरणात देखील सुरेश धस यांनी उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी वाल्मिक कराडची मुले सुशील कराड (Sushil Karad) आणि श्री कराडने (Shree Karad) पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना १५० कॉल केले असून त्यांचे फोन कॉल पडताळले आहेत. त्यामुळे याप्रकरणाचा तपास करणारे पोलीस कर्मचारी हे वादग्रस्त असल्याचा आरोप धस यांनी केला आहे.
Suresh Dhas on Mahadev Munde murder case
त्यामुळे आता वाल्मिक कराड याच्यानंतर त्याची दोन मुले अडचणीत आली आहेत. दरम्यान, सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याचे निवेदन बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहे. त्यामुळे आता धस यांची ही मागणी मान्य होणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Dhananjay Munde यांच्यामुळे ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या वाढल्या अडचणी, हायकोर्टात होणार महत्त्वाची सुनावणी
- “राज्याला मिळणार तिसरा उपमुख्यमंत्री, तो शिंदे गटाचा.. “; Sanjay Raut यांच्या दाव्याने खळबळ
- Walmik Karad च्या सांगण्यावरून महादेव गित्तेंवर हल्ला, Jitendra Awhad यांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडिओमुळे खळबळ