Sanjay Raut । सत्ताधारी आणि विरोधक सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांना टार्गेट करत असतात. यावरून अनेकदा राज्याचे राजकीय वातावरण देखील तापल्याचे पाहायला मिळते. सध्या असेच काहीसे चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहे.
सध्या भाजप (BJP) आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बिनडोक राजकारणी असल्याची जहरी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली होती. याच टीकेला आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“चंद्रशेखर बावनकुळे यांनी 600 कोटीचा भूखंड एक रुपयाला घेतला. असा बालिशपणा आम्ही कधीच करणार नाही. ईडी आणि सीबीआय कुठे आहे? या माणसाला अटक केली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना महसूलमंत्री करून मोठा गुन्हा केला आहे. आम्हाला द्याल का? कोण बावनकुळे? ते तर रावणकुळे आहेत,” अशी टीका राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut targets Chandrashekhar Bawankule
दरम्यान, राऊत यांच्या टीकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊतांच्या या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजप काय प्रत्युत्तर देते? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :