Share

“अनेक गुन्हांमध्ये नाव समोर येत असेल तर… “; Amol Kolhe यांचा वाल्मिक कराडवर निशाणा

Sharad Pawar MP Amol Kolhe has made a big statement regarding the murder of Massajog village sarpanch Santosh Deshmukh.

by MHD

Published On: 

Amol Kolhe criticize Walmik Karad on Santosh Deshmukh murder case

🕒 1 min read

Amol Kolhe । खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अडचणीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतोय. याप्रकरणी आता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

“जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामुळे जर अनेक गुन्हांमध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव समोर येत असेल तर कारवाई करणे गरजेची आहे. जर कारवाई झाली नाही तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कोण पाठीशी घालतंय ते पाहणे गरजेचे आहे,” असे वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केले आहे.

दरम्यान, नुकतेच वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. यामुळे वाल्मिक कराडला मोठा धक्का बसला होता. त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Amol Kolhe on Walmik Karad

तसेच जर संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे नाव समोर येते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर याप्रकरणी त्यांचे नाव समोर आले तर नाइलाजाने धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांना घ्यावा लागेल. इतकेच नाही तर मुंडेंची राजकीय कारकीर्द देखील संपुष्टात येऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या