Ajit Pawar | जितेंद्र आव्हाड म्हणजे राजकारणातील राखी सावंत; अजित पवार गटाने लाज सोडली

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. अशात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटामध्ये ( Ajit Pawar ) पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झालेली दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार ( Ajit Pawar ) गटाचे नेते सुरज चव्हाण ( Suraj Chavan ) यांनी शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Ahwad) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणजे राजकारणातील राखी सावंत, असं सुरत चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाडांना म्हटलं आहे. सुरज चव्हाण यांनी एका महिला अभिनेत्रीवरून जितेंद्र आव्हाडांवर टीका केल्यामुळे अजित पवार गटाने लाज सोडली असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

Jitendra Awad is the Rakhi Sawant of politics – Suraj Chavan 

प्रसार माध्यमांशी बोलत असताना सुरज चव्हाण म्हणाले, “जितेंद्र आव्हाड फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजित पवारांबद्दल ( Ajit Pawar )  बोलत असतात.

जितेंद्र आव्हाड म्हणजे राजकारणातील राखी सावंत. आम्हाला त्यांच्या एवढ्या गोष्टी माहित आहे की त्यांच्यावर दादा ( Ajit Pawar ) मला माफ करा, असं म्हणण्याची वेळ येईल.”

शरद पवार गटातील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करून सुरज चव्हाण थांबले नाही तर त्यांनी शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांवर ( Rohit Pawar ) देखील टीकास्त्र चालवलं आहे.

युवा संघर्ष यात्रेवरून त्यांनी रोहित पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. “राहुल गांधी यांनी भारतामध्ये ज्याप्रकारे यात्रा काढली होती, त्याप्रकारे रोहित पवारांनी महाराष्ट्रात यात्रा काढली आहे.

युवा संघर्ष यात्रा ही एक यात्रा नसून पिकनिक सुरू आहे. या यात्रेवर फक्त मी नाही तर संपूर्ण जनता टीका करत आहे. ज्यांच्या राशीत कधीच संघर्ष नव्हता ते आज संघर्ष यात्रा करताना दिसत आहे”, असं म्हणतं सुरज चव्हाण यांनी रोहित पवारांना धारेवर धरलं.

दरम्यान, अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) नेहमी महिला सुरक्षेबाबत बोलत असतात. अशात त्यांच्याच पक्षातील नेत्याने एका महिलेवरून जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे.

अशात या प्रकरणावर रूपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देतील? रूपाली चाकणकर सुरज चव्हाण यांच्या विरोधात बोलतील का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.