Manoj Jarange | मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो – मनोज जरांगे

Manoj Jarange | यवतमाळ: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आमने-सामने आले आहे.

या मुद्द्यावरून दोन्ही नेते राज्यामध्ये जागोजागी सभा घेत आहे. या सभांमध्ये बोलत असताना दोन्ही नेते एकमेकांवर खालच्या स्तराला जाऊन टीका करताना दिसले.

अशात या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी ( Manoj Jarange )  पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो, असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “मराठा समाजाला एकदा आरक्षण मिळू द्या, मग मी त्याचा कार्यक्रम वाजवतो. इतक्या उच्च दर्जाचा एक पुढारी गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळू देत नाहीये.

त्यामुळे त्याच्यासारखा कलंकित मंत्री राज्यात असू शकत नाही.” मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देतील? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Will Marathas get reservation from OBC?

दरम्यान, मनोज जरांगे ( Manoj Jarange )  यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरलं.

या मुद्द्यावर ठोस तोडगा काढण्यासाठी जरांगे यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. मात्र, त्याआधी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे.

दोन्ही समाज एकमेकांच्या विरुद्ध आंदोलन करत आहे. अशात राज्य शासन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.