Virat Kohli | विराट कोहलीला भारतीय टी-20 संघात स्थान नाही? त्याच्या जागी होऊ शकते ‘या’ खेळाडूची निवड

Ishan Kishan can bat at number 3 in place of Virat Kohli in T20 World Cup 2024

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2024 ( IPL 2024 ) नंतर भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धा 2024 ( T-20 World Cup ) खेळणार आहे.

या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करत टी-20 संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

तर गेल्या काही दिवसांपासून टी-20 क्रिकेटपासून लांब असणारे खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली ( Virat Kohli ) ही स्पर्धा खेळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

Will Virat Kohli get a place in the T20 team?

रोहित शर्माने टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करावं, अशी इच्छा बीसीसीआयने व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे टी-20 संघात विराट कोहलीला ( Virat Kohli ) स्थान मिळणार नसल्याच्या चर्चा सुरू आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांची निवड झाली असल्याची चर्चा सुरू आहे.

तर दुसरीकडे विराट कोहलीला ( Virat Kohli ) या स्पर्धेसाठी संघात स्थान मिळणार नसल्याचं बोललं जात आहे. कारण टीम इंडियातील युवा फलंदाज उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे.

यामध्ये इशान किशन, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग इत्यादींचा समावेश आहे. यापैकी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये नंबर 3 वर विराटच्या ( Virat Kohli ) जागी इशान किशन मैदानावर उतरणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धा 2024 मध्ये विराटच्या ( Virat Kohli ) जागी नंबर 3 वर इशान किशन फलंदाजी करू शकतो, अशा चर्चा सुरू आहे.

इशान किशननंतर सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग आणि रवींद्र जडेजा उर्वरित फलंदाजीच्या जागा भरतील, असं देखील बोललं जात आहे. अशात बीसीसीआय खरंच विराटच्या ( Virat Kohli ) जागी इशानला संधी देतील का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या