IPL 2024 | यंदाच्या आयपीएलच्या लिलावामध्ये ‘या’ विदेशी खेळाडूंना असेल सर्वाधिक मागणी

The IPL 2024 auction will be held in Dubai on December 19, 2023

IPL 2024 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2024 साठी सर्व संघांसह सर्व खेळाडू तयारीला लागले आहे. कारण लवकरच आयपीएलचा ( IPL 2024 ) लिलाव होणार आहे.

19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये आयपीएलचा  ( IPL 2024 ) लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी तब्बल 1166 खेळाडूंच्या नावांची नोंदणी झाली आहे.

यामध्ये 830 भारतीय खेळाडू आहेत. मात्र, यंदाच्या आयपीएल  ( IPL 2024 )  लिलावामध्ये सर्व संघांचं परदेशी खेळाडूंवर अधिक लक्ष राहणार आहे.

कारण या खेळाडूंनी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आयपीएल 2024  ( IPL 2024 ) च्या लिलावात खालील खेळाडूंना सर्वाधिक मागणी असू शकते.

वानिंदू हासरंगा ( Vanindu Hasaranga-IPL 2024 )

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने या खेळाडूला रिलीज केले आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल  ( IPL 2024 )  लिलावामध्ये हासरंगाला मोठी मागणी असू शकते.

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये याने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे या आयपीएल लिलावामध्ये तो काही संघांची पसंती ठरू शकतो.

डॅरिल मिशेल ( Daryl Mitchell-IPL 2024 )

नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेल याने उत्कृष्ट खेळी खेळत भारतविरुद्ध सामन्यात शानदार शतक झळकवलं होतं.

त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो सातत्याने चांगलं प्रदर्शन करत राहिला. अशात यंदाच्या आयपीएल  ( IPL 2024 ) लिलावामध्ये त्याला पसंती मिळू शकते.

हॅरी ब्रुक ( Harry Brooke-IPL 2024 )

गेल्या आयपीएल हंगामामध्ये या खेळाडूने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. गेल्या आयपीएल हंगामामध्ये तो सनरायझर्स हैदराबादसोबत खेळला.

त्याचबरोबर त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये अत्यंत चांगली खेळी खेळलेली आहे. अशात या आयपीएल  ( IPL 2024 ) हंगामामध्ये तो डिमांडमध्ये असू शकतो.

ट्रॅव्हिस हेड ( Travis Head-IPL 2024 )

या ऑस्ट्रेलियन खेळाडूने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर भारत विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यामध्ये त्याने शानदार 137 धावांची खेळी खेळली.

या सर्व घडामोडीनंतर यंदाच्या आयपीएल  ( IPL 2024 )  लिलावामध्ये त्याला मोठी मागणी असू शकते. त्याचबरोबर त्याच्यावर मोठी बोली लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.