Delhi Capitals | रिकी पॉंटिंगची सुट्टी! IPL 2024 मध्ये DC चा कोच असणार भारतीय दिग्गज

Delhi Capitals | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या महिन्यामध्ये इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) चा 16 हंगाम संपला आहे. आयपीएल 2023 संपताचं सर्व संघ आयपीएल 2024 च्या तयारीला लागले आहे. अशा दिल्ली कॅपिटल्स संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. रिकी पॉंटिंग आता दिल्ली कॅपिटल्सचा कोच राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

Saurav Ganguly will be the coach of Delhi Capitals

आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये बीसीसीआय माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) कोच असणार आहे. संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी दादा पार पाडणार आहे. आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची अवस्था वाईट राहिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दिल्लीला पहिल्या पाच सामन्यांमध्ये पराभव सामोरे जावे लागले होते.

आयपीएल 2018 पासून रिकी पॉंटिंगने दिल्लीच्या (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होते. त्यानंतर 2020 मध्ये दिल्ली पहिल्यांदाच आयपीएल अंतिम सामन्यात पोहोचली होती. मात्र, यावर्षी दिल्लीला उत्कृष्ट कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संघाचा प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, सौरव गांगुली दिल्ली (Delhi Capitals)  कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचं एका बंगाली वृत्तपत्रांमध्ये म्हटलं आहे. मुख्य प्रशिक्षकासोबतच सौरव गांगुली संघाचे संचालक म्हणून देखील काम पाहणार असल्याचं दिल्ली फ्रेंचाईजीनं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या