Sharad Pawar | दिल्ली: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. वर्धापन दिनानिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र, राष्ट्रीय पक्ष नसताना राष्ट्रवादीचा कार्यक्रम दिल्लीत का होत आहे? असा प्रश्न भाजप कार्यकर्ते उपस्थित करत आहे.
Is Narendra Modi your father?
महाविकास आघाडीतील (Sharad Pawar) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटातील नेत्यांवर टीका केली होती. “तुम्ही शिवसेनेला आपलं म्हणतात, मग तुमचा बाप कोण? नरेंद्र मोदी तुमचा बाप आहे का?”, असं संजय राऊत म्हणाले होते. मात्र, आता राष्ट्रवादी दिल्लीत वर्धापन दिन साजरा करत असल्यामुळे दिल्लीत त्यांचं कोण आहे? असा प्रश्न भाजपकडून उपस्थित केला गेला आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. यानंतर महाविकास आघाडी (Sharad Pawar) कडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन दिल्लीत साजरा करत आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे सगळे दिल्लीत उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिल्लीत का वर्धापन दिन साजरा करत आहे? राजधानीत नक्की NCP चं कोण आहे? असा प्रश्न उपस्थित भाजप कार्यकर्ते करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane | निलेश राणेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचलं! म्हणाले, “माझ्यासाठी स्वतःला अटक…”
- Gold Rate | सोन्या चांदीच्या किमतीत बदल! जाणून घ्या प्रति तोळा भाव
- Love Jihad | लव्ह जिहाद प्रकरण चर्चेत असताना मुस्लिम मुलीने बांधली हिंदू मुलासोबत लग्नगाठ
- Weather Update | कुठे तीव्र ऊन तर कुठे मुसळधार पाऊस, पाहा हवामान अंदाज
- Religion Conversion | ‘आम्ही आमच्या मर्जीने धर्म बदलला’ हिंदू महिला शिक्षिकांनी केला मुस्लिम धर्मात प्रवेश