Share

Religion Conversion | ‘आम्ही आमच्या मर्जीने धर्म बदलला’ हिंदू महिला शिक्षिकांनी केला मुस्लिम धर्मात प्रवेश

Religion Conversion | मध्य प्रदेश: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटानंतर अनेक लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. त्याचबरोबर यानंतर हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात प्रवेश करायला लावणाऱ्या अनेक धक्कादायक बातम्या समोर आल्या आहे. मात्र, मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यात वेगळाच प्रकार घडला आहे. या ठिकाणी 3 हिंदू महिला शिक्षिकांनी स्वखुशीनं मुस्लिम धर्मात प्रवेश केला आहे.

Hindu female teachers have changed their names

मध्यप्रदेश मधील दमोह जिल्ह्यातील गंगा जमुना शाळेत हा प्रकार घडला आहे. प्रसारमाध्यमांसमोर येऊन या तिन्ही महिला शिक्षिकांनी स्वखुशीने धर्म बदलण्याचं (Religion Conversion) सांगितलं आहे. त्यांनी त्यांची नावे देखील बदलली आहे. यामध्ये प्राची जैन यांनी तबस्सूम बानो, अनिता यदुवंशी यांनी निता खान आणि दीप्ती श्रीवास्तव यांनी अफशा शेख नाव ठेवले आहे.

मुस्लिम धर्मात प्रवेश केल्यानंतर महिला शिक्षिका म्हणाल्या, “आम्ही आमच्या इच्छेने धर्म बदलला (Religion Conversion) आहे. त्याचबरोबर संविधानाने आम्हाला तो अधिकार दिला आहे. त्यानुसार आम्ही धर्म परिवर्तन केलं आहे. धर्मांतर करण्याचा हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे. त्यामुळे याबाबत कोणत्याही चौकशीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत.”

दरम्यान, या प्रकरणाची (Religion Conversion)  सविस्तर चौकशी करण्याचे आदेश मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात दखल घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असं भाजप प्रदेशाध्यक्ष व्हिडी शर्मा यांना म्हटलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी व्हावी, असंही ते यावेळी म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

Religion Conversion | मध्य प्रदेश: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटानंतर अनेक लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या