Sanjay Raut | पुणे: भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला होता. शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म, असं वादग्रस्त वक्तव्य निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला. त्याचबरोबर भाजप नेत्यानं राणेंना चांगलंच सुनावलं आहे.
Sanjay Kakade reaction on Nilesh Rane statement
भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी निलेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. संजय काकडे म्हणाले, “निलेश राणे यांनी शरद पवारांबद्दल जे काही वक्तव्य केलं होतं त्याचा मी वैयक्तिक निषेध करतो. त्याचबरोबर निलेश राणे, नितेश राणे (Nitesh Rane) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मीडियाने बंदी घातली पाहिजे.”
Media should not go to Rane and Raut
पुढे बोलताना ते म्हणाले, “संजय राऊत (Sanjay Raut), निलेश राणे आणि नितेश राणे यांच्याकडे मीडियाने अजिबात जाऊ नये. मी स्वतः पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना याबाबत पत्र लिहिणार आहे. कारण शरद पवार यांच्यासारख्या व्यक्तीबाबत अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर पक्षाची प्रतिमा खराब होत आहे.”
दरम्यान, निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होऊ लागतात. कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार.”
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari | राणे म्हणजे भाजपच्या तुकड्यावर जगणारा सरडा आहे – अमोल मिटकरी
- Sandipan Bhumre | उद्धव ठाकरे यांचे आई-बाप कोण? – संदीपान भुमरे
- Sharad Pawar | शरद पवारांना भाजपकडून जीवे-मारण्याची धमकी? धमकी देणाऱ्याचे BJP नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल
- Sandipan Bhumre | उद्धव ठाकरे का गेले होते शरद पवार-सोनिया गांधीना भेटायला? त्यांचे बाप कोण? आई कोण? – संदीपान भुमरे
- Sanjay Raut | शरद पवारांनंतर संजय राऊतांना अज्ञात व्यक्तीनं दिली जीवे-मारण्याची धमकी