Sanjay Raut | शरद पवारांनंतर संजय राऊतांना अज्ञात व्यक्तीनं दिली जीवे-मारण्याची धमकी

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. पवारानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी याबद्दल माहिती दिली आहे. Tell Sanjay Raut to stop talking to … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. पवारानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

Tell Sanjay Raut to stop talking to the media every morning

संजय राऊत (Sanjay Raut ) यांना एका फोन कॉलच्या माध्यमातून जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचं सुनील राऊत यांनी सांगितलं आहे. सुनील राऊत म्हणाले, “मला माझ्या फोनवर कॉल आला होता. दररोज सकाळी माध्यमांसोबत बोलणं बंद करा, असं संजय राऊत यांना सांगा. नाहीतर संजय राऊत यांच्यासोबत तुम्हालाही मारू.”

दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या धमकीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पवार साहेबांच्या नावाने माझ्या व्हाट्सअपवर मेसेज आला आहे. एका वेबसाईटच्या माध्यमातून शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मी न्याय मागायसाठी पोलिसांकडे आले आहे.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही