Nilesh Rane | मुंबई: राज्यामध्ये सध्या औरंगजेबाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला होता. शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म, असं वादग्रस्त वक्तव्य निलेश राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला असून आज राष्ट्रवादी आंदोलन करत आहे.
NCP should protest in Mumbra city
निलेश राणे यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करणार आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत राष्ट्रवादीला खुलं चॅलेंज दिलं आहे. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “माझ्या विरोधात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आंदोलन करायचं असेल तर मी त्यांना चॅलेंज करतो की त्यांनी ते मुंब्रा शहरामध्ये म्हणजे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मतदारसंघात करून दाखवावं.”
माझ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आंदोलन करणार असेल तर मी त्यांना चॅलेंज करतो की हिम्मत असेल तर मुंब्रा शहरामध्ये म्हणजेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात हेच आंदोलन करून दाखवावे.
मालेगाव, मुंब्रा, भिवंडी ही तीन शहरं आजच्या आंदोलनाचे प्रमुख ठिकाण असावेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 9, 2023
मालेगाव, मुंब्रा, भिवंडी ही तीन शहर राष्ट्रवादीच्या आजच्या आंदोलनाचे प्रमुख ठिकाण असावेत, असंही त्यांनी (Nilesh Rane) या ट्विटमध्ये म्हटलं आहे. निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधीच आक्रमक झाला आहे. अशात निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राष्ट्रवादीला चॅलेंज केलं आहे.
दरम्यान, निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होऊ लागतात. कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार.”
महत्वाच्या बातम्या
- Gautami Patil | “गौतमीताई थोडी लावणीची तयारी करून या, नाहीतर…”; छोट्या पुढारीचा गौतमी पाटीलला इशारा
- Weather Update | केरळमध्ये मान्सून दाखल, तर महाराष्ट्रामध्ये कधी येणार पाऊस?
- RBI Governor | 500 रुपयांच्या नोटांवर बंदी? पुन्हा चलनात येणार 1000 रुपयाची नोट? RBI गव्हर्नर म्हणतात…
- IND vs AUS | भारत जोमात ऑस्ट्रेलिया कोमात! सिराजच्या घातक गोलंदाजीपुढ ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे
- AURIC City Bidkin | ऑरिक होणार स्वदेशी ड्रोन आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाचे केंद्र