IND vs AUS | भारत जोमात ऑस्ट्रेलिया कोमात! सिराजच्या घातक गोलंदाजीपुढ ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे

IND vs AUS | लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळला जात आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला होता.

Australia scored 469 runs in 121.3 overs

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 121.3 षटकांमध्ये 469 धावा केल्या. पहिल्या डावाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन फलंदाजाला धूळ चाखली.

दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात (IND vs AUS) भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट्स घेतल्या. लंच ब्रेकसाठी जेव्हा खेळ थांबला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाच्या 7 बाद 422 धावा झाल्या होत्या.

ब्रेकनंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या (IND vs AUS) उरलेल्या तीन विकेट्स घेत 47 धावा दिल्या. यादरम्यान मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ने 28.3 षटकात 4 विकेट्स घेतल्या आहे. तर त्याने 108 धावा दिल्या आहेत. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाने 496 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.