Chitra Wagh | मुंबई: महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा वाद चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. महाविकास आघाडी आणि औरंगजेबाचा DNA नक्कीच सारखा असेल, अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
Aurangzeb’s children have started growing in Maharashtra
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची मुलं अचानक वाढायला लागली आहे. ज्या महाविकास आघाडीने त्यांना जन्म दिला त्या महाविकास आघाडीचा DNA आणि औरंगजेबाचा DNA एकच असावा.”
महाराष्ट्र में औरंगजेब की औलादें अचानक बढ़ने लगी है… जिन्होंने उसे जन्म दिया, उस महाविकास आघाडी का डीएनए और औरंगजेब का डीएनए ज़रूर एक ही होगा ।
कुछ युवाओं ने औरंगजेब का स्टेटस रखने से प्रदेश में स्थिति संवेदनशील हो गई है, तभी महाविकास अघाड़ी के नेताओं द्वारा दंगे भड़काने का… pic.twitter.com/7m2bywiWm7
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 8, 2023
“काही तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यामुळे राज्यातील परिस्थिती संवेदनशील बनली आहे. महाविकास आघाडीचे नेते दंगली भडकवत आहेत. हे सर्व एका षड्यंत्राखाली केले जात आहे, हे लोकांना माहीत आहे”, असंही त्या (Chitra Wagh) या ट्वीटमध्ये म्हणाल्या.
Sanjay Raut and Jitendra Awhad DNA Test – Chitra Wagh
पुढे त्या म्हणाल्या, “दंगल भडकावणारे संजय राऊत (Sanjay Raut) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची DNA तपासणी व्हायला हवी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते औरंगजेबाची मुलं उखडून टाकतील.”
महत्वाच्या बातम्या
- Monsoon Update | आनंदाची बातमी! केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती
- Chitra Wagh | सुप्रिया ताईंची रंग बदलण्याची कला पाहून सरड्यालाही लाज वाटेल – चित्रा वाघ
- Gopichand Padalkar | …तर गोपीचंद पडळकर यांना नीट करायला वेळ लागणार नाही; राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला थेट इशारा
- Sanjay Raut | औरंग्यांना भाजपकडून ताकद पुरवली जाते; संजय राऊतांचा गंभीर आरोप
- Gopichand Padalkar | “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद पवार शमशुद्दीन तर अजित हा अझरुद्दीन असता “- गोपीचंद पडळकर