Gopichand Padalkar | “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद पवार शमशुद्दीन तर अजित हा अझरुद्दीन असता “- गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील राजकारणात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद  शमशुद्दीन झाला असता, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार (Sharad Pawar)आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.

Sharad would have been Shamshuddin

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर, जितेंद्रचा जितुद्दिन झाला असता, अजित (Ajit Pawar) हा अझरुद्दीन झाला असता आणि शरद हा शमशुद्दीन झाला असता.”

https://twitter.com/padlkar007/status/1666486982883803139?s=20

दरम्यान, राज्यामध्ये सध्या औरंगजेबचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या या टिकेला निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nilesh Rane criticized Sharad Pawar

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होऊ लागतात. कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.