Sharad Pawar | सातारा: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात एका केंद्रीय मंत्र्यांनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डिवचलं आहे.
केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी सातारा येथे बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डिवचलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “कोण शरद पवार? मी त्यांना ओळखत नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांचा पक्ष किती मोठा आहे? मला माहित नाही.”
A party of four or five MPs does not count
पुढे बोलताना ते म्हणाले, “चार-पाच खासदारांच्या पक्षाची गणना होत नाही. ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी शरद पवार (Sharad Pawar) निवडणूक लढवून बघू शकतात.” केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “सध्या देशामध्ये धार्मिक वाद वाढत चालले आहे. व्यक्तिगत कारणांमुळे समाजावर हल्लाबोल करणे अत्यंत चुकीचे आहे. मुस्लिम समाजाकडून चुका होतात तशा हिंदूकडूनही होऊ शकतात. देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्माबद्दल काळजी वाटावी, अशी सध्या त्यांची परिस्थिती आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Rahul Narwekar | मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार आहे; राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं
- Kolhapur | कोल्हापूर शहरातील इंटरनेट सेवा सुरळीत सुरू
- Monsoon Update | अखेर प्रतीक्षा संपली! केरळमध्ये पुढील 24 तासांत दाखल होणार मान्सून
- Sharad Pawar – शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार ? – शरद पवार
- IND vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया ‘या’ तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर