Sharad Pawar – छत्रपती संभाजीनगर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( औरंगाबाद ) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. मी शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार असं विधान शरद पवारांनी केल्याचा दावा न्यूज़ 18 lokmat ने केला आहे. पवार छत्रपती संभाजी नगर येथील सौहार्द या कार्यक्रमात बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या प्रवासाच्या आठवणी काढत असतांना त्यांनी हे विधान केलं असल्याचे न्यूज़ 18 lokmat ने बातमी दिली आहे.
तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणतात, भाषणात पवार म्हणाले की, माझ्या एका सहकाऱ्याच्या इच्छेनुसार समृद्धी महामार्गावरून औरंगाबादला आलो आहे. संभाजीनगर म्हणतो, मला वाद वाढवायचा नाही. समृद्धी महामार्गाला किती शेतजमीन गेली आहे ते पाहा. देशातील लोकसंख्या वाढत आहेत. तर जमीन कमी होत असल्याचे पवार आपल्या भाषणात म्हटले आहे. पवारांनी हे विधान केलं नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसापासून मी ( सुरज चव्हाण ) आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहेत. साहेबांनी कुठल्याच कार्यक्रमात या शहराच्या नामांतराविषयी आपले मत मांडलेले नाही. असे ट्वीट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसापासून मी आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहेत. साहेबांनी कुठल्याच कार्यक्रमात या शहराच्या नामांतराविषयी आपले मत मांडलेले नाही.@News18lokmat ने खोडसाळपणा केला आहे.या वाहिनीच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया आम्ही सुरु करणार आहोत.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) June 7, 2023
दुसरीकडे या विधानावरून भाजपने शरद पवारांना चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपकडून एक ट्विट करण्यात आलं असून मतांसाठी इतके लाचार झाला की औरंग्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा तुम्ही अपमान करता. हे राज्य हा देश छत्रपती शिवाजी राजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा आहे. पण शरद पवार तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का?
मतांसाठी इतके लाचार झाला की औरंग्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा तुम्ही अपमान करता. हे राज्य हा देश छत्रपती शिवाजी राजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा आहे. पण @PawarSpeaks तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का? #Maharashtra #Kolhapur pic.twitter.com/4WoDsj2raj
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 7, 2023
Sharad Pawar statement on renaming aurangabad as Chhatrapati Sambhajinagar
महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांचं नामांतर केलं होते. औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतर केले होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने तो आदेश रद्द करुन नवीन आदेश काढला. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतर केले.
Nilesh Rane Criticized Sharad Pawar
निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होऊ लागतात. कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार.”
शरद पवार ( Sharad Pawar ) पत्रकार परिषद-
“सध्या देशामध्ये धार्मिक वाद वाढत चालले आहे. व्यक्तिगत कारणांमुळे समाजावर हल्लाबोल करणे अत्यंत चुकीचे आहे. मुस्लिम समाजाकडून चुका होतात तशा हिंदूकडूनही होऊ शकतात. देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्माबद्दल काळजी वाटावी, अशी सध्या त्यांची परिस्थिती आहे.”
पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “समाजाला जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर कोणत्याही घटकाला मागे ठेवून चालत नाही. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक धर्मांमध्ये आणि समाजामध्ये भेदभाव निर्माण करतात. देशातील जनतेनं एकत्र येऊन याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे.
“राज्यामध्ये सातत्याने दंगली होत आहे. या सर्व दंगली धार्मिक कारणामुळे होत असल्यामुळे हा विषय चिंतेचा आहे. या धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात आहे”, असा आरोप शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND Vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया ‘या’ तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर
- Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे – सुप्रिया सुळे
- Nitesh Rane | कोल्हापूरमध्ये होणाऱ्या दंगलींमागं उध्दव ठाकरे मास्टरमाईंड? नितेश राणेंचा गंभीर आरोप
- Monsoon Update | दिलासादायक! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली आनंदाची बातमी
- Kolhapur Protest | तीव्र आंदोलनामुळं कोल्हापुरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद