Monsoon Update | दिलासादायक! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली आनंदाची बातमी

Monsoon Update | टीम महाराष्ट्र देशा: अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) सक्रिय झाल्यामुळे मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. मात्र, मान्सूनबाबत हवामान खात्याने एक आनंददायी बातमी दिली आहे. पुढील 48 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Cyclone in Arabian Sea will intensify

अरबी समुद्रातील चक्रीवादळ आणखीन तीव्र होणार असल्याची माहिती हवामान तज्ञ कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हे चक्रीवादळ आणखीन भयंकर रूप धारण करणार असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

The cyclone is likely to move northward in the next 24 hours

येत्या 24 तासांमध्ये हे चक्रीवादळ उत्तरेकडे जाण्याची शक्यता असल्याचं देखील कृष्णकांत होसळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या 48 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, अरबी समुद्रामध्ये ‘बिपरजॉय’ नावाचे चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याने वादळाला ऊर्जा मिळत असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. पुढील 24 तासात या चक्रीवादळाची तीव्रता आणखीन वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आला आहे.

महत्वाच्या बातम्या