WTC Final | WTC फायनलचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? जाणून घ्या

WTC Final | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना आजपासून (7 जुन) सुरू होणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला आज दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या चाहते या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग बघू शकतात.

You can watch WTC Final live streaming on Disney Plus Hotstar

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) च्या अंतिम सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग क्रिकेट प्रेमी डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकतात. आयपीएल सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर करण्यात आलं होतं. मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टारवर बघू शकतात. त्याचबरोबर हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क देखील बघू शकतात.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final) अंतिम सामना खेळण्यासाठी 2 पिच तयार करण्यात आले आहे. लंडनमध्ये सध्या ‘जस्ट स्टॉप ऑइल’ आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, म्हणून ओव्हलच्या क्रिकेट व्यवस्थापनाने अंतिम सामन्यासाठी दोन मैदान तयार केले आहे.

दरम्यान, भारतीय संघ आयसीसी अंतिम सामना (WTC Final) पहिल्यांदाच रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारतीय संघाने 2011 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा आयसीसी जेतेपद मिळवण्याचा दुष्काळ संपणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या