Share

Sharad Pawar | राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जातात; शरद पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Sharad Pawar | छत्रपती संभाजीनगर: राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यामध्ये जाणीवपूर्वक धार्मिक दंगली घडून आणल्या जातात, असा गंभीर आरोप शरद पवारांनी राज्य सरकारवर केला आहे. Religious disputes are increasing in the country आज संभाजीनगर … Read more

Published On: 

Sharad Pawar | छत्रपती संभाजीनगर: राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यामध्ये जाणीवपूर्वक धार्मिक दंगली घडून आणल्या जातात, असा गंभीर आरोप शरद पवारांनी राज्य सरकारवर केला आहे.

Religious disputes are increasing in the country

आज संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “सध्या देशामध्ये धार्मिक वाद वाढत चालले आहे. व्यक्तिगत कारणांमुळे समाजावर हल्लाबोल करणे अत्यंत चुकीचे आहे. मुस्लिम समाजाकडून चुका होतात तशा हिंदूकडूनही होऊ शकतात. देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्माबद्दल काळजी वाटावी, अशी सध्या त्यांची परिस्थिती आहे.”

पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “समाजाला जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर कोणत्याही घटकाला मागे ठेवून चालत नाही. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक धर्मांमध्ये आणि समाजामध्ये भेदभाव निर्माण करतात. देशातील जनतेनं एकत्र येऊन याच्या  विरोधात उभं राहिलं पाहिजे.

“राज्यामध्ये सातत्याने दंगली होत आहे. या सर्व दंगली धार्मिक कारणामुळे होत असल्यामुळे हा विषय चिंतेचा आहे. या धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात आहे”, असा आरोप शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install