Rain Update | टीम महाराष्ट्र: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील नागरिक आणि शेतकरी हैराण झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशात पुढील 3 ते 4 तास राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
Winds of 30 to 40 kmph are expected along with rain
राज्यामध्ये पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain Update) पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह 30 ते 40 किमी प्रतितास वारे वाहण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे किनारपट्टी भागामध्ये जास्त पाऊस (Rain Update) पडणार नसल्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. परंतु, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना सावध राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, 04 जून रोजी राज्यात मान्सून (Monsoon) दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मान्सूनसाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये 09 जून रोजी मान्सून (Rain Update) दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- UPI Payment | सावधान! यूपीआय पेमेंट फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी करा फॉलो ‘या’ टिप्स
- Viral News | 40 वर्षीय व्यक्तीचं लग्नासाठी थेट तहसीलदारांना पत्र! म्हणाला, “लग्नासाठी गोरी आणि सडपातळ बायको…”
- Odisha Train Accident | अखेर बाप, बाप असतो! रेल्वे अपघातात शवगृहातून आपल्या मुलाला शोधलं जिवंत
- Ashadhi Wari | आषाढी वारीत ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी! जाणून घ्या सविस्तर
- Dress Code In Temple | जळगाव जिल्ह्यातील ‘या’ मंदिरात ड्रेस कोड लागू