Viral News | राजस्थान: लग्नासाठी बायको मिळत नाही, म्हणून लोक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतात. असाच एक प्रयत्न राजस्थान मधील 40 वर्षीय व्यक्तीनं केला आहे. या व्यक्तीने लग्नासाठी बायको हवी, यासाठी थेट तहसीलदारांना पत्र लिहिले आहे. त्यांचं हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
I want fair and slim wife for marriage
राजस्थानमधील बहरावंडा येथील रहिवासी असलेल्या महावर यांनी हे पत्र (Viral News) लिहिले आहे. विशेष म्हणजे या पत्राची तहसीलदारांनी देखील दखल घेतली आहे. महावर यांनी लिहिलेला हा अर्ज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अर्जामध्ये त्यांनी लिहिले आहे, “मला लग्नासाठी गोरी आणि सडपातळ बायको हवी आहे. तिचे वय साधारण 30 ते 40 वर्ष दरम्यान असावे. त्याचबरोबर तिला घरातली सर्व कामं देखील करता आली पाहिजे.”
“माझ्या घरातली परिस्थिती खूप हलकीची आहे. त्याचबरोबर मी एकटा राहतो. एकटेपणामुळे मी अस्वस्थ होत चाललो आहे. मला घरातली कामं करता येत नाही. त्यामुळे मला मदत करण्यासाठी आणि घरातील कामं करण्यासाठी मला बायकोची अत्यंत गरज आहे. कृपया मला बायको मिळवून देण्याचा प्रयत्न करा”, असंही त्यांनी या पत्रात (Viral News) म्हटलं आहे.
बड़ी अजीब प्रार्थना आई है pic.twitter.com/LpOHPwlKgG
— राजस्थानी ट्वीट (@8PMnoCM) June 4, 2023
दरम्यान, ‘राजस्थानी ट्विट’ या ट्विटर अकाउंटवरून हे पत्र (Viral News) पोस्ट करण्यात आलं आहे. हे पत्र सध्या ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral post) होत आहे. त्याचबरोबर नेटकरी या पोस्टवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Odisha Train Accident | अखेर बाप, बाप असतो! रेल्वे अपघातात शवगृहातून आपल्या मुलाला शोधलं जिवंत
- Ashadhi Wari | आषाढी वारीत ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी! जाणून घ्या सविस्तर
- Dress Code In Temple | जळगाव जिल्ह्यातील ‘या’ मंदिरात ड्रेस कोड लागू
- WTC Final | WTC फायनल पूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी! सामन्याआधी आले ‘हे’ फोटो समोर
- WhatsApp Scam | मला तुमच्याशी मैत्री करायची, असं म्हणतं तरुणाने स्कॅमरलाचं शिकवला चांगला धडा