WhatsApp Scam | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल सोशल मीडियावर अनेक धक्कादायक बाबी समोर येतात. अशात ट्विटरवर सध्या असंच काहीतरी व्हायरल होत आहे. महेश नावाच्या ट्विटर युजरने हा सर्व प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. महेशने एका स्कॅमरला चांगलाच धडा शिकवला आहे.
There are many scam messages on WhatsApp
आजकाल व्हाट्सअपवर अनेक स्कॅम (WhatsApp Scam) मेसेज येतात. यामध्ये पैशाची लालसा दाखवून लोकांना फसवले जाते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये असाच काहीतरी प्रकार घडताना दिसत आहे. महेश नावाच्या एका ट्विटर युजरने सोशल मीडियावर हा सर्व प्रकार शेअर केला आहे. महेशने एका स्कॅमरसोबत झालेली चॅट ट्विटरवर पोस्ट केली आहे.
महेशला व्हाट्सअपवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज (WhatsApp Scam) आला होता. मेसेजमध्ये लिहिले होते, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही मला वेळ देऊ शकतात का? हा मेसेज पाहिल्यानंतर महेशला संशय आला आणि त्याने त्याला दुसर काहीही न विचारता मला तुमच्याशी मैत्री करायची आहे, असं विचारलं.
a whatsapp scammer taught me a valuable lesson today 🙇🏻 pic.twitter.com/RVueXDl9Cr
— Mahesh (@mister_whistler) June 4, 2023
पुढे स्कॅमरने (WhatsApp Scam) महेशला मेसेज केला की तुम्ही काही मिनिटात हजार रुपये कमवू शकतात. यावर उत्तर देत महेश म्हणाला, मी एक इमानदार व्यक्ती आहे. या सर्व चॅटचे स्क्रीन शॉट महेशने ट्विटरवर शेअर केले आहे. ट्विटरवर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral post) होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Shivrajyabhishek Sohala | किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा! गडावर लाखो मावळ्यांची उपस्थिती
- Gold Rate | 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
- Love Jihad | ज्या तरुणीला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखवला, तिचं मुस्लिम प्रियकरासोबत झाली फरार
- Petrol Price | कुठं महाग तर कुठं स्वस्त! जाणून घ्या आजचे पेट्रोल दर
- Odisha Train Accident | रेल्वे अपघातात तब्बल 48 तास दिली मृत्यूला झुंज! अखेर मृत्यूच्या दारातून परतला तरुण