Odisha Train Accident | रेल्वे अपघातात तब्बल 48 तास दिली मृत्यूला झुंज! अखेर मृत्यूच्या दारातून परतला तरुण

Odisha Train Accident | बालासोर: गेल्या पाच दिवसांपूर्वी ओडिसामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातातील प्रवाशांचा अजूनही शोध घेणे सुरू आहे. तीन रेल्वेच्या झालेल्या या अपघातामध्ये आतापर्यंत 288 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातस्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्य सुरू असताना एक मोठी घटना समोर आली आहे.

A young man has been found alive under the wreckage of a train

ओडिसामध्ये झालेल्या रेल्वे अपघातात (Odisha Train Accident) ट्रेनच्या ढिगार्‍याखाली एक तरुण जिवंत सापडला आहे. हा तरुण दोन दिवसापासून त्या ढिगार्‍याखाली फसला होता, अशी माहिती मिळाली आहे. त्याला या ढिगार्‍यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बेशुद्ध अवस्थेत हा तरुण सापडला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तो शुद्धीत आला आहे.

तब्बल 48 तास मृत्यूला झुंज (Odisha Train Accident) देणाऱ्या या तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाचा मोबाईल आणि पाकीट सापडल्याने त्याची ओळख मिळाली आहे. हा तरुण मूळचा आसामचा असून त्याचं नाव दिलाल आहे. उपचार केल्यानंतर हा तरुण शुद्धीवर आला आहे.

दरम्यान, ओडिसा येथील बहानगा बाजार रेल्वे स्थानकावर भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला आहे. यामध्ये कोरोमंडळ एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर झाली होती. त्यानंतर या गाड्यांना हावडा एक्सप्रेसने धडक दिली. या अपघातानंतर देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button