Odisha Train Accident | रेल्वे अपघातात हरवलं प्रेम! फुटलेल्या कोचजवळ सापडलं प्रेमपत्र

Odisha Train Accident | बालासोर: ओडिसा राज्यातील बालासोर जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातस्थळी बचावकर्ते  अपघातग्रस्तांचं सामान गोळा करत आहे. सामान गोळा करत असताना त्यांना त्यामध्ये एक प्रेम पत्र मिळालं आहे. या प्रेम पत्रामध्ये बंगाली भाषेत कविता लिहिलेली आहे.

A love letter found near the broken coach

रेल्वे अपघातातील (Odisha Train Accident) अपघातग्रस्तांचं सामान गोळा करत असताना फुटलेल्या कोचजवळ एक डायरी सापडली आहे. या डायरीमध्ये हत्ती, मासे, गुलाब, मोर इत्यादी चित्र रेखाटलेली आहे. त्याचबरोबर या डायरीत बंगाली भाषेत कविता लिहिलेली आहे.

बालासोर रेल्वे अपघातात (Odisha Train Accident) सापडलेल्या या डायरीमध्ये बंगाली भाषेत “अल्पो अल्पो मेघ थेके हलका ब्रिस्ती है, छोटा छोटा गोलपो थेके भालोबासा सृष्टी आहे” म्हणजेच विखुरलेल्या ढगांमधून रिमझिम पाऊस पडतो, त्याचप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रेम वाढतं, अशी कविता लिहिलेली आहे.

दरम्यान, ओडिसा येथील बहानगा बाजार रेल्वे स्थानकावर भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला आहे. यामध्ये कोरोमंडळ एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर झाली होती. त्यानंतर या गाड्यांना हावडा एक्सप्रेसने धडक दिली. या अपघातानंतर देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या