Nitesh Rane | ठाकरे गट म्हणजे चायनीज शिवसेना; नितेश राणेंची ठाकरे गटावर खोचक टीका

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. दिल्लीमध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा हाय कमांड बसला आहे. शिंदे-फडणवीस दिल्लीत जाऊन मुजरा करतात, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. संजय राऊत यांच्या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं  आहे.

Uddhav Thackeray’s Shivsena is the Chinese Shivsena

भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना चायनीज शिवसेना आहे. खरी शिवसेना दिल्लीत जात नाही, असे तुम्ही म्हणता. मग तुमचे मालक उद्धव ठाकरे जनपथवर साडी नेसून जायचे का? दिल्लीत मातोश्रीची आई आहे का?”

पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “संजय राऊत यांचे मालक कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून परदेशी दौरे करत आहे. दुसऱ्यांना नैतिकता शिकवणाऱ्यांनी कधी स्वतः राजीनामा दिला आहे का?”

“तुमच्या मालकाच्या सरकारमध्ये अनेक लोकांचे जीव गेले. तेव्हा तुम्हाला पश्चाताप झाला नाही का? नैतिकतेची भाषा तुम्ही करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुमच्या मालकाने काय केलं ते आम्हाला सांगा”, अशा शब्दात नितेश राणेंनी (Nitesh Rane) संजय राऊत आणि ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या