Dress Code In Temple | राज्यातील मंदिरांमध्ये ड्रेस कोड हवा; मंदिर ड्रेस कोड प्रकरणामध्ये विश्व हिंदू परिषदेची उडी

Dress Code In Temple | मुंबई: राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांसाठी आणि पुजारांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. त्याचबरोबर पुणे आणि नागपूरमधील काही मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये आता विश्व हिंदू परिषदेने उडी घेतली आहे. महाराष्ट्रातील मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्याची मागणी आता विश्व हिंदू परिषदेनेही केली आहे.

The decision taken regarding temple dress code should be followed by all

मंदिर ड्रेस कोडबाबत (Dress Code In Temple) घेण्यात आलेल्या निर्णयाचे सर्वांनी पालन केले पाहिजे. त्याचबरोबर सर्व मंदिरांमध्ये या गोष्टीची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे विश्व हिंदू परिषदेनं म्हटलं आहे.

महाराष्ट्र टेम्पल फेडरेशनने राज्यातील मंदिरांमध्ये ड्रेस कोड (Dress Code In Temple) लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र टेम्पल फेडरेशनच्या या निर्णयाला विश्व हिंदू परिषदेने पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील श्री गोपाळ कृष्ण मंदिर गोरक्षण सभा (धंतोली), श्री दुर्गा माता मंदिर (हिल टॉप), हनुमान मंदिर (बेलोरी) आणि श्री बृहस्पति मंदिर (कानोलीबारा) या मंदिरामध्ये ड्रेस कोडची (Dress Code In Temple) सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.