Ajit Pawar | “…तर कानाखाली आवाज काढल”; भर बैठकीत अजित पवार संतप्त

Ajit Pawar | पुणे: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात अजित पवार यांचं वक्तव्य चर्चेत  आहे. भर बैठकीमध्ये अजित पवारांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना चांगलं सुनावल आहे. ऐकलं नाही तर कानाखाली आवाज काढलं, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

Don’t fight for positions

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही कामाला लागा. मुळशीच्या लोकांना पदं  दिलेली असून त्यांना देखील काम करायचं आहे. पदांसाठी भांडण करायचं नाही. पदांसाठी भांडला तर एकेकाच्या कानाखाली आवाज काढलं.”

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “पदांसाठी जर कुणी भांडण करणार असाल, तर लगेच पदाचा राजीनामा घेतल्या जाईल. कारण यातून तुमची बदनामी होत नाही तरी यातून शरद पवार (Sharad Pawar) साहेबांची बदनामी होते. तुम्ही पदाधिकारी झाल्यानंतर लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.”

दरम्यान, 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे. हा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी अजित पवारांनी (Ajit Pawar)  पुण्यात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलचं सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button