Weather Update | अरबी समुद्रात चक्रीवादळ? पाहा हवामान स्थिती

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 4 जून रोजी पावसाने (Rain) हजेरी लावली. मात्र, मुंबई, नवी मुंबई आणि उपनगर भागांमध्ये अजूनही उकाडा कायम आहे. तर जळगाव, भुसावळ, पुणे, सातारा या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. वादळी-वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Chance of Cyclone formation in Arabian Sea on 5th June

हवामान विभागाने दिलेले अंदाजानुसार (Weather Update), 5 जून रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्र (Arabian Sea) चक्रीवादळ (Cyclone) निर्माण होण्याची शक्यता आहे. या भागात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. या चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील उर्वरित जिल्ह्यात देखील होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

केरळमध्ये यंदा 4 जून रोजी मान्सूनचे आगमन आणि अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. 8 ते 10 जून दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक किनाऱ्यालगतच्या भागातील स्थिती बिघडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान खात्याने केले आहे.

दरम्यान, आज मराठवाड्यामध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर मुंबई आणि विदर्भामध्ये उष्णता जाणवण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महत्वाच्या बातम्या