Sanjay Raut Vs Ajit Pawar | धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं; राऊत प्रकरणावर अजित पवारांची माघार; म्हणाले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | नाशिक: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर शाब्दिक वार केला आहे. राऊतांच्या या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेला अजित पवार (Ajit Pawar) उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत बोलल्यानं आमच्या अंगाला काही भोकं पडत नाही. ती लोकं मोठी माणसं आहे. आम्ही त्यांचा खूप आदर करतो. मात्र, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नव्हे.” त्यानंतर माध्यमांनी अजित पवारांना संजय राऊतांबद्दल आणखी प्रश्न विचारले. त्यावर अजित पवार यांनी ‘नो कॉमेंट्स’ म्हणतं बोलणे टाळले.

Sanjay Raut should be restrained while speaking

माध्यमांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी संजय राऊत थुंकले आणि मग त्यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृत्यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत यांनी बोलताना संयम राखला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले होते.

Spitting is better than peeing in dams

अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या या प्रतिक्रियेला उत्तर देत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. मी माझ्या पक्षासोबत ठामपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचे विचार कधीच येत नाही.”

 

महत्वाच्या बातम्या