Dr. Tatyarao Lahane | जे जे हॉस्पिटल आणि आमचं नातं संपलं – डॉ. तात्याराव लहाने

Dr. Tatyarao Lahane | मुंबई: मुंबईतील सुप्रसिद्ध जे जे रुग्णालयातील (J J Hospital) वाद वाढत चालला आहे. प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी आज पत्रकार परिषद घेत या वादातील आपली भूमिका मांडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. लहानेसोबत नेत्रचिकित्सा विभागातील 08 प्राध्यापक डॉक्टर उपस्थित होते.

Our relationship with JJ Hospital is over

आजपासून आमचं आणि जे जे रुग्णालयाचं नातं संपलं असल्याचं डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आहे. डॉ. लहाने आणि डॉ. पारखे यांच्यावर निवासी डॉक्टरांनी मनमानीपणा करत असल्याचा आरोप केला होता. आमची चौकशी करा आणि मगच गुन्हा दाखल करा, अशी मागणी करूनही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे, असा आरोप डॉ. लहाने यांनी केला आहे.

जे जे रुग्णालयातील नेत्र चिकित्साविभाग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विभाग आहे. दरवर्षी आमच्याकडे 70 ते 80 हजार रुग्ण येतात. आमच्यावर आरोप केल्यानंतर आमची चौकशी करा अशी मागणी करूनही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असही ते (Dr. Tatyarao Lahane) यावेळी म्हणाले.

दरम्यान, डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) हे नाव राज्यातील गाव-खेड्यापर्यंत पोहोचलेलं आहे. डॉ. लहानेंनी हजारो दृष्टीहीन नागरिकांसाठी काम केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी लाखो रुग्णांची सेवा केली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर लहाने हे सेवानिवृत्त असूनही जे जे रुग्णालयात सेवा करतं आपलं कर्तव्य बजावत आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी ते आजही काम करतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.