WTC Final | पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण ठरणार वर्ल्ड चॅम्पियन? जाणून घ्या

WTC Final | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल (IPL) संपताचं क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलची ओढ लागली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना 07 ते 11 जून दरम्यान रंगणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) च्या अंतिम सामन्याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट बघत आहे. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द झाला तर कोण विजेता ठरेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 07 ते 11 जुन दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 12 जून हा सामन्यासाठी रिझर्व डे ठेवण्यात आला आहे.

If the match is canceled due to rain, both teams will be winners

हा सामना (WTC Final) पावसामुळे रद्द झाला किंवा टाय झाला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ संयुक्त विजेते ठरणार आहेत. विजेत्या संघाला मिळणारी रक्कम दोन्ही संघांमध्ये विभागून घेतली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला तब्बल 13 कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे.

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम (WTC Final) सामन्यासाठी टीम इंडिया नव्या जर्सीत मैदानावर उतरणार आहे. टीम इंडियाचा नवीन किट प्रायोजक आदिदास असणार आहे. याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करत माहिती दिली होती.

महत्वाच्या बातम्या

Back to top button