Gas Cylinder | टीम महाराष्ट्र देशा: सामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा बदल झाले आहे. गॅस सिलेंडर विकणाऱ्या कंपनीने नवीन दर जारी केले आहे. मात्र, हे बदल फक्त व्यावसायिक सिलेंडरसाठी करण्यात आले आहे.
Reduction in rates of commercial cylinders
व्यावसायिक सिलेंडरचा (Gas Cylinder) दर 1 मे 2023 रोजी साधारण 172 रुपयांनी उतरला होता. तर दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर 83.5 रुपयांनी खाली आला होता. सध्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1773 रुपये आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाली असली, तरी घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
01 जून पासून मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडर (Gas Cylinder) 83.50 रुपये, कोलकत्ता 85 रुपये आणि चेन्नईमध्ये 84.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. हा बदल फक्त व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत झाला आहे.
दरम्यान, कच्चा इंधनाच्या (Gas Cylinder) जागतिक पातळीवरील किमतीच्या आधारावर तेलाच्या किमती ठरवण्यात येतात. त्यामुळे दर महिन्यात या किमती खाली-वर होताना दिसतात. देशातील सरकारी तेल कंपन्या या एलपीजीचा दर ठरवतात.
महत्वाच्या बातम्या
- Thackeray Group | शिंदेंना मोठा झटका! शिंदेंना हरवण्यासाठी ठाकरेंनी मैदानात उतरवला ‘हा’ जुना शिलेदार
- WhatsApp | वापरकर्त्यांनो सावधान! व्हाट्सअप वापरताना ‘या’ लिंकवर क्लिक करणं ठरू शकतं धोकादायक
- Mumbai Airport | माझ्याकडं बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिलेचा गोंधळ, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
- Vajramuth | महाविकास आघाडी म्हणजे वज्रमुठ नव्हे वज्रमुत आहे; ‘या’ नेत्याची बोलताना जीभ घसरली
- Asia World Cup | भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले?