Vajramuth | वाई: राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशाच शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. महाविकास आघाडी म्हणजे वज्रमुठ नव्हे वज्रमुत आहे, असं महेश शिंदे यांनी म्हटलं आहे. महेश शिंदे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Mahavikas Aghadi is not a Vajramuth but a Vajramut
माध्यमांशी बोलत असताना आमदार महेश शिंदे यांना वज्रमुठबद्दल (Vajramuth) विचारण्यात आले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, “महाविकास आघाडी म्हणजे वज्रमुठ नव्हे वज्रमुत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे हाताचा अंगठा आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हाताची करंगळी आहे. करंगळीचा वापर कशासाठी करतात हे सर्वांना ठाऊक आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “महाविकास आघाडीचे (Vajramuth) मधले बोट म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहे. तर तिसरे बोट अजित पवार (Ajit Pawar) आणि चौथे बोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आहे. शरद पवार यांनी आजपर्यंत कुणाला कसा अंगठा दाखवला आहे, हे आजपर्यंत कुणालाही समजलेलं नाही.”
दरम्यान, शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यातील शिवतीर्थ पोवई नाक्यावर आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर (Vajramuth) खालच्या भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात नवीन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Asia World Cup | भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले?
- Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! ‘या’ विभागाचा लागला सर्वाधिक 10 वी चा निकाल
- SSC Result | ऑनलाइन रिझल्ट बघताना इंटरनेट गेलं किंवा वेबसाईट हँग झाली, तर निकाल कसा बघायचा? जाणून घ्या
- Sharad Pawar | ठाकरे परदेशात; पवार-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात काय शिजतंय?
- Amol Mitkari | शिवराज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का? अमोल मिटकरींचा राज्य सरकारला खडा सवाल