SSC Result | ऑनलाइन रिझल्ट बघताना इंटरनेट गेलं किंवा वेबसाईट हँग झाली, तर निकाल कसा बघायचा? जाणून घ्या

SSC Result | टीम महाराष्ट्र देशा: इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज दुपारी 01 वाजता इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. अनेकदा ऑनलाईन रिझल्ट बघताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रिझल्ट जाहीर (SSC Result) झाल्यानंतर सर्वजण अधिकृत वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करतात. मात्र, त्यामुळे बोर्डाची वेबसाईट हँग होण्याची शक्यता अधिक असते. वेबसाईट हँग झाल्यावर गोंधळून न जाता तुम्ही खालील पद्धतीने निकाल बघू शकतात.

Maharashtra SSC 10th Result 2023

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते.

151 students got 100 percent marks in SSC 10th Result 2023

दहावीच्या निकालात १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के मार्क मिळाले असून लातूर मधील १०८ विद्यार्थी आहेत. तर इतर विभागातील आकडेवारी  पुणे: ५, औरंगाबाद: २२, मुंबई: ६,  अमरावती: ७, कोकण: ३

You can check the result through SMS

  • यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलमधील SMS ॲप ओपन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला क्रिएट न्यू मेसेज वर क्लिक करावे लागेल.
  • मग तुम्हाला MHHSC (स्पेस) सीट नंबर प्रविष्ट करावा लागेल.
  • हा मेसेज तुम्हाला 57766 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
  • काही क्षणातच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर निकालाचे तपशील मिळतील.

10 वी चा निकाल कुठं बघायचा? (Where to see 10th result?)

10 वी चा निकाल (SSC Result) ऑनलाइन बघण्यासाठी विद्यार्थी खालील वेबसाइटला भेट देऊ शकतात.

https://mahresult.nic.in/

https://sscresult.mkcl.org/

https://ssc.mahresults.org.in/

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक माध्यमिक शिक्षण मंडळ पत्रकार परिषद घेत हा निकाल जाहीर केला. यामध्ये मुलींचा निकाल 95.87 टक्के तर मुलांचा निकाल 92.05 टक्के लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची निकालात बाजी मारली आहे.

Maharashtra SSC 10th Result 2023

कोकण : 98.11 टक्के

कोल्हापूर : 96.73 टक्के

पुणे : 95.64 टक्के

मुंबई : 93.66 टक्के

औरंगाबाद : 93.23 टक्के

अमरावती : 93.22 टक्के

लातूर : 92.67 टक्के

नाशिक : 92.22 टक्के

नागपूर : 92.05 टक्के

महत्वाच्या बातम्या