Eknath Shinde | न भूतो न भविष्यति असा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार – एकनाथ शिंदे

Eknath Shinde | रायगड: आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) किल्ले राजगडावर साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे.

The 350th Shivrajyabhishek Sohala will be concluded with great pomp.

यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा भूतो न भविष्यति असा भव्य दिव्य पार पडणार आहे. या सोहळ्याचे सर्व नियोजन आणि तयारी झालेली आहे. त्याचबरोबर वर्षभर हा आपला कार्यक्रम सुरू राहणार आहे.”

दरम्यान, ढोल ताशाच्या गजरात शिवभक्तांनी (Eknath Shinde) छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे. या भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांनी गर्दी केली आहे. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची राजेशाही मिरवणूक निघणार आहे.

आज सकाळी 07 ते 12 या वेळेत किल्ले रायगडावर राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा संपन्न होणार आहे. शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा 06 जून पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या