Rohit Pawar | चौंडी: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कर्जत-जामखेडमधील राम शिंदे (Ram Shinde) आणि रोहित पवार पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. राजकारणामध्ये पवारांच्या नादी कोणी लागू नका, असा इशारा रोहित पवार यांनी विरोधकांना दिला आहे.
यावेळी बोलत असताना राम शिंदे म्हणाले, “अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी हे जन्मस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा काही उपयोग नाही. इथे राजकारणाला वाव मिळणार नाही.”
Pawar knows more about politics
राम शिंदे यांना उत्तर देत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “राजकारणाच्या बाबतीमध्ये पवारांना त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे असं मला वाटतं. त्यामुळे पवार कधीच सामाजिक कार्यक्रमात किंवा जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण आणत नाही. जिथं राजकारण करायला हवं, पवार तिथंच राजकारण करतात. राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या कुणीही नादी लागू नये.”
Rohit Pawar Warn To Ram Shinde
पुढे बोलताना ते (Rohit Pawar) म्हणाले, “राजकारण कोण करतंय? इथे लोकांना सेवा मिळत आहे की नाही ते आम्ही एक कार्यकर्ता म्हणून बघत आहोत. हे सर्व जयंती साजरी करण्यासाठी आहे. ते याला राजकारण म्हणत असतील तर तो त्यांचा विषय आहे. समाजकारण काय असतं? हे आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत.”
महत्वाच्या बातम्या
- Dress Code In Temple | भाविकांसह पुजाऱ्यांना देखील ड्रेस कोड हवा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी
- Shinde Group | शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार उद्धव ठाकरेंचा संपर्कात; ‘ही’ आहेत नावं
- Pankaja Munde | पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाचं भलं होणार नाही- महादेव जानकर
- BJP MLA | भाजप आमदार, पाप-पुण्य मोजायला गेले आणि खांबामध्ये अडकले
- Sanjay Raut | नेहमीचं रडगाणं सोडून पंकजा मुंडेंनी परिणामाचा विचार न करता निर्णय घ्यावा – संजय राऊत