Dress Code In Temple | भाविकांसह पुजाऱ्यांना देखील ड्रेस कोड हवा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dress Code In Temple | नागपूर: काही दिवसांपूर्वी तुळजापूर मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. मात्र, भाविकांचा विरोध असल्यामुळे 24 तासात हा निर्णय मागे घेण्यात आला. परंतु, त्यानंतर राज्यात हे प्रकरण चांगलं चर्चेत आलं आहे. पुण्यासह नागपूरमधील काही मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.

भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवीन मागणी करण्यात आली आहे. भाविकांप्रमाणे मंदिरातील पुजाऱ्यांना देखील ड्रेस कोड हवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी केली आहे.

NCP demands dress code for priests like devotees

मंदिर महासंघाने आवाहन केल्यानंतर नागपूरमधील पाच मंदिरात ड्रेस कोड (Dress Code In Temple) लागू करण्यात आला आहे. त्यानंतर पुजाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाविकांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे, यावर आमचा आक्षेप नाही. मात्र, मंदिरांमध्ये पुजाऱ्यांसाठी देखील ड्रेस कोड हवा, अशी मागणी शेखर सावरबांधे यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे शेखर सावरबंद यांनी केलेल्या मागणीचं पुजाऱ्यांनी स्वागत केलं आहे. पुजाऱ्यांसाठी ड्रेस कोड (Dress Code In Temple) लागू करण्याच्या मागणीवर पुजाऱ्यांनी काहीच हरकत नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील श्री गोपाळ कृष्ण मंदिर गोरक्षण सभा (धंतोली), श्री दुर्गा माता मंदिर (हिल टॉप), हनुमान मंदिर (बेलोरी) आणि श्री बृहस्पति मंदिर (कानोलीबारा) या मंदिरामध्ये ड्रेस कोडची (Dress Code In Temple) सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या