BJP MLA | भाजप आमदार, पाप-पुण्य मोजायला गेले आणि खांबामध्ये अडकले

BJP MLA | टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुका जवळ आल्याने काँग्रेस आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचं दिसतं आहे. अशात मध्यप्रदेशच्या रतलाम ग्रामीणचे भाजप आमदार दिलीप मकवाना यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार दिलीप मकवाना मंदिराच्या दोन खांबांमध्ये अडकलेले दिसत आहे.

BJP MLAs went to measure sin and virtue and got stuck on the pillar

गुनावद या ठिकाणी प्रसिद्ध शिवशक्ती मंदिर आहे. या मंदिरामध्ये दोन खांब आहे. ज्यावरून पाप-पुण्य मोजले जातात. शिवमंदिरात असलेल्या या दोन विशाल खांबांना पाप-पुण्याचे स्तंभ म्हणतात. या दोन खांबांमधील अंतर खूपच कमी आहे. त्यामुळे जो व्यक्ती या दोन खांबामधून जातो तो पुण्यवान आत्मा आहे आणि जो जात नाही किंवा त्या खांबामध्ये अडकतो तो पापी व्यक्ती आहे असे मानले जाते. आमदार (BJP MLA) दिलीप मकवाना यांचा या खांबामध्ये अडकलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रतलाम ग्रामीणचे आमदार (BJP MLA) दिलीप मकवाना हे सध्या माजी आमदार मथुरालाल डमार यांच्या नाराजीचा सामना करत आहे. तिकीट नाकरण्याच्या यादीत दिलीप मकवाना यांचे देखील नाव आहे. अशा परिस्थितीत त्यांचा पाप-पुण्याच्या खांबामध्ये अडकलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आमदाराच्या (BJP MLA) पाप-पुण्याचा पुरावा खांबांनी दिला आहे. बाकी त्यांच्या कर्माची फळे विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना देईल. आमदार दिलीप मकवाना यांचा हा व्हिडिओ दोन वर्ष जुना असल्याचं म्हटलं जातं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button