Shinde Group | शिंदे गटात खळबळ! भाजपने शिंदे गटाला विश्वासात न घेता घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Shinde Group | मुंबई: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. अशात खासदार गजानन कीर्तिकर यांनी थेट वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने राज्यातील 22 लोकसभेच्या जागांवर दावा केला असल्याचं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे सोमवारपासून भाजपने या विधानसभा मतदारसंघात ‘मोदी@9’ अभियानाअंतर्गत जनसंपर्क मोहीम सुरू केल्याने शिंदे गटात खळबळ उडाली आहे. शिवसेनेसोबत युती करून भाजप प्लॅन-बी आखु शकतो.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला 48 जागा देण्यात येणार असल्याचं सांगून राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण केला आहे. तर भाजपकडून आम्हाला चांगली वागणूक दिली जात नसल्याचा दावा शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर (Shinde Group) यांनी केला होता. अशात शिवसेनेने राज्यातील लोकसभेच्या 22 जागांवर दावा केल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भाजपा आता प्लॅन-बी तयार करत आहे.

BJP took a big decision without trusting the Shinde group

राज्यातील लोकसभेच्या 28 जागांवर समन्वयकांची नियुक्ती करत भाजपने ताकद वाढवण्याचं  कामं सुरू केलं आहे. यामध्ये 13 खासदार असलेल्या मतदारसंघात देखील समन्वयक नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या मतदारसंघात भाजपने समन्वयक नियुक्ती केल्याने शिंदे गटातील (Shinde Group) खासदार भाजपवर नाराज झाल्याचे दिसून आले आहे.

“आम्हाला विश्वासात न घेता भाजपने हे पाऊल उचलल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर भाजपचा हा प्रयत्न आमच्यासाठी नवीन आव्हान घेऊन येणार आहे. आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही असा”, दावा शिंदे गटाच्या (Shinde Group) एका खासदारानं केला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.