Dr. Tatyarao Lahane | मुंबई: मुंबईतील सुप्रसिद्ध जे जे रुग्णालयातील (J J Hospital) वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक राजीनामे दिले आहे. यामध्ये प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर जे जे रुग्णालयाचे डीन डॉ. पल्लवी सापळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
We have not received the resignation of Dr. Tatyarao Lahane
डीन डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या, “निवासी डॉक्टरांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. त्यांचे आरोप खोटे आहेत. त्याचबरोबर डॉ. लहानेंसह (Dr. Tatyarao Lahane) कुणाचीही राजीनामे आमच्यापर्यंत आले नाही. आम्हाला या राजीनाम्याबद्दल माध्यमांतून कळालं आहे”.
जे जे रुग्णालयातील नेत्र विकार विभागातील प्राध्यापक, डॉक्टर, विभाग प्रमुख हे विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी यासाठी जे जे रुग्णालयातील डॉक्टर्स आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. लहाने (Dr. Tatyarao Lahane) आणि त्यांच्यासह 9 डॉक्टरांनी राजीनामे दिल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान, डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) हे नाव राज्यातील गाव-खेड्यापर्यंत पोहोचलेलं आहे. डॉ. लहानेंनी हजारो दृष्टीहीन नागरिकांसाठी काम केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी लाखो रुग्णांची सेवा केली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर लहाने हे सेवानिवृत्त असूनही जे जे रुग्णालयात सेवा करतं आपलं कर्तव्य बजावत आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी ते आजही काम करतात.
महत्वाच्या बातम्या
- Sachin Tendulkar | मूग गिळून गप्प का? काँग्रेसने सचिनच्या घराबाहेर लावले पोस्टर
- Weather Update | मान्सूनचा वाढला वेग! राज्यात ‘या’ तारखेला हजेरी लावणार पाऊस
- Gautami Patil | कोण आहेत गौतमी पाटीलचे वडील? तिचं मूळ गाव कोणतं? जाणून घ्या
- Shinde Group | ठाकरेंना मोठा झटका! मुंबईतील ‘या’ बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
- Ravindra Jadeja | भारतीय संस्कृती जपणाऱ्या रवींद्र जडेजाच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहे का?