Shinde Group | ठाकरेंना मोठा झटका! मुंबईतील ‘या’ बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Shinde Group | मुंबई: राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट (Thackeray group) यांच्यामध्ये वाद-विवाद होत असतात. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाला दणका दिला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिंदे सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे.

Thackeray group’s Kiran Landge joins Shinde group

ठाकरे गटातील एका बड्या नेत्यांनं शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. घाटकोपरचे माजी नगरसेवक किरण लांडगे (Kiran Landge) यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्यानंतर किरण लांडगे म्हणाले, “शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे घाटकोपरमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मी आज खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.”

यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “खऱ्या शिवसेनेत (Shinde Group) ठाकरे गटातील अनेकजण प्रवेश करणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आम्ही काम करत नाही. आम्ही पूर्णपणे विकास कामावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली आहे. मुंबई दिवसेंदिवस चांगली होताना तुम्हाला दिसत आहे. सरकारचे लक्ष सर्व प्रकल्पांवर आहे. मुंबई बाहेर गेलेल्या प्रकल्पांना मुंबईत परत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत.”

महत्वाच्या बातम्या